सखी मेळावा लातूर

 

(लातूर) स्वयम्‌ शिक्षण प्रयोग व कृषी विज्ञान केंद्र,लातूरच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथे आज ८ मार्च रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात कृषी,आरोग्य, पंचायती राज, बचत व पत व व्यवसायात यशस्वी महिलांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 1993 पासुन स्वयम्‌ शिक्षण प्रयोगने लावलेले हे रोपटे आता इतरांना सावली देण्यासाठी मोठ्या कल्पवृक्ष झाले आहे.

आजच्या मेळाव्यास लातूर,रेणापूर व औसा तालुक्यातील २०० महिलांनी सहभाग घेतला.

प्रास्ताविकात श्रीमती नसीम शेख यांनी स्वयम्‌ शिक्षण प्रयोगच्या कार्याची व सखींच्या कार्यविस्ताराचा इतिहासच कथन केला.

 

 

श्री.दिग्रसे एस.एस. मुख्य वैज्ञानिक, कृषी विज्ञान केंद्र, लातूर

सुरुवातीच्या सत्रात कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख वैज्ञानिक श्री. दिग्रसे यांनी सर्व महिलांचे सेंद्रीय व शास्त्रीय पध्दतीने शेती केल्याबध्दल अभिनंदन केले. व कृषी विज्ञान केंद्राची माहिती सांगीतली व कृषी विज्ञान केंद्रातून शेतीशी संबंधीत माहिती,ज्ञान, मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचे विषद केले.

यावेळी काही महिला शेतकरींनींचा त्यांच्या शेतीतल्या उत्कष्ठ कार्याबध्दल सत्कार करण्यात आला.

श्रीमती स्वामी श्रीदेवी, हरंगुळ यांनी सेंद्रीय शेती व सेंद्रीय किटकनाशकाचा वापर करुन शेती यशस्वी केली आहे.

श्रीमती दिपमाला स्वामी, महापुर यांनी अनेक पीक पध्दतीने अन्न सुरक्षेचा शेतीत स्विकार केला आहे.

श्रीमती जयश्री बने, मोरवटी यांनी स्वनिर्णयातून एक एकर शेतीचा पथदर्शी प्रयोग यशस्वी केला आहे.

या शिवाय अनेक महिलांनी शेती व शेतीशी संबंधीत व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन शेती व व्यवसायास सुरुवात केली आहे. या महिलांनाही प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

श्री.सी.डि.पाटील, प्रकल्प संचालक, आत्मा, लातूर यांनी कृषी महिला गटाचे महत्व विषद करुन जास्तीत जास्त महिलांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन केले. कृषी विभाग व आत्माच्या वतीने कृषी महिला गटांना योग्य तो लाभ देण्याचे अभिवचन त्यांनी दिले.

श्री.पाचपांडे, डिडिएम,नाबार्ड यांनी स्टॅण्डअप या भारत सरकारच्या कार्यक्रमाची परिपूर्ण माहिती दिली.

डॉ.शारदा जाधव, प्राचार्या, आंतरभारती यांनी महिलांचे स्थान व त्यांनी आपल्या जीवनातील समस्यां व परिस्थितीचा सामना कसा करावा याचे मार्गदर्शन केले.

श्री.पद्माकर देशपांडे यांनी अन्न प्रक्रीया व्यवसायाचे महत्व व गरज यावर मार्गदर्शन केले.सोयाबीन प्रक्रीया व्यवसायाची माहिती महिलांना विषेश आवडली.

उपस्थित महिलां शेतक-यांपैकी अनेकींना आपले अनुभव व भावी नियोजन सादर केले

या महिलांनी विविध क्षेत्रात आपला ठसा तर उमटवला आहेच. शिवाय त्या हे कार्य पुढे नेण्याचा वसाही हिंमतीने उचलत आहेत. या कार्याची दखल यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने घेऊन स्वयम्‌ शिक्षण प्रयोगला मुमेंटम फॉर चेंज हा पुरस्कारही दिला आहे. या पुरस्काराच्या ख-या मानकरी या महिलाच आहेत. शिवाय प्रतिवर्षीप्रमाणे जागतीक महिला दिनाचे औचित्य पुर्ण करण्यासाठी हा मेळावा आयोजिक केला आहे.

खरे तर ८ मार्चच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र यावे, विचार करावा, अनुभव द्यावे व घ्यावे, पुढची दिशा ठरवावी हा याचा मुख्य उद्देश आहे.

या मेळाव्याच्या आयोजनात कृषी विज्ञान केंद्र,लातूरचे श्री.दिग्रसे एस.एस., बेद्रे एस.बी., देशमुख एस.बी., गुंजाळ ए.ए.,कवडे एस.सी.,मोहिते ए.एस.,सोळुंखे एस.बी., सुर्यंवंशी व्हि.एम., कोकाटे एस.एल.,आडगावकर एम.एम. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

दंत आरोग्य तपासणी शिबीर

 

मेळाव्याच्या निमित्ताने एमआटी, लातूरच्या सहयोगातून उपस्थित महिलांची दंत आरोग्य तपासणी ठेवण्यात आली आहे. उपस्थित सर्व महिलांची तपासणी मोफत करण्यात येणार आहेत. शिवाय काही उपचाराची गरज पडल्यास नाममात्र दरात उपचारही दिले जाणार आहेत. यासाठी एमआयटी चे डॉ. धुमाळ यांच्या नेतृत्वाखालील टिम मेळावा स्थळी पोहोचली आहे व तपासणीस सुरुवात झाली आहे.