सखी मेळावा सोलापूर

सोलापूर भागातल्या महिला आता सर्वांच्या पुढे एक पाऊल उचलत आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो.

सोलापूर जिल्ह्यातील उपस्थित अधिका-यांची संमिश्र प्रतिक्रीया

सोलापूर येथे आज दिनांक 9 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी एकत्र यावे. एकमेकांना अनुभव द्यावे व घ्यावे या उद्देशाने या मेळाव्याचे स्वयम्‌ शिक्षण प्रयोग व सहयोगी संस्थांच्या व्दारा आयोजन करण्यात आले होते. आजच्या सखी मेळाव्यास सोलापूर जिल्हयातील ४५० महिलांनी सहभाग नोंदवला.मेळाव्यात महिलांनी आपले अनुभव मांडले.

 

उपस्थित सखींपैकी ५ सखींनी उपस्थितापुढे आपले अनुभव सांगीतले. हाच धागा पकडुन उपविभागीय कृषी अधिकारी यांनी स्वयम्‌ शिक्षण प्रयोगच्या कामाने महिलांना ख-या अर्थाने शेतकरीन बनवले आहे. या महिलांच्या कार्याला आम्ही सलाम करतो अशी प्रतिक्रीया दिली.

महिलांनी आता कृषी महिला गट बनवावेत. आत्मा व कृषी विभागाच्या वतीने सर्व योजनांचा सखी महिलांनी लाभ घ्यावा.शेतकरीन अनुभवी महिलेने आता इतर महिलांना पुढे येऊन प्रशिक्षण व पाठबळ दिले पाहिजे यासाठी आमचा विभाग कायम तत्पर राहील.अशी ग्वाही कृषी अधिका-यांनी दिली.

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्री. नेवाले यांनी आमच्या विभागाच्या योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन केले. मी अधिकारी म्हणून आपल्या पाठीशी उभा राहीन असे अभिवचन दिले.

जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. निटुरे यांनी महिलांनी शासकिय सुविधेचा लाभ कसा घ्यावा, आरोग्याची काळजी आपण कशी घ्यावी रोग होऊ नये म्हणून काय करावे. कुपोषन निर्मुलन घरच्या घरी कसे करावे. महिलांनी आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन कुटुंबास निरोगी कसे राखावे याचे मार्गदर्शन केले.

कृषी अधिकारी श्री.जोशी यांनी आजचा कार्यक्रम नाविन्यपूर्ण वाटला कृषीमध्ये शाश्वत शेतीचा अंगिकार करुन शेतीला समृध्द करावे असे आवाहन केले.

महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोन्नती अभियानाच्या श्रीमती त्रिवेणी बोंदे व गिता गायकवाड यांनी आपल्या महिलांनी आता पुढे यावे. शासनाच्या व संस्थांच्या मार्फत विविध प्रशिक्षण व व्यवसायासाठी पाठबळ दिले जात आहे. त्याचा पुरेपुर वापर करुन यशस्वी व्यवसायीक व्हावे असे आवाहन केले. महिलांचे नाव आता ७/१२ वर आले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

वेली - women entrepreneurship and leadership institute

अनेक महिलांची स्वप्नपुर्ती म्हणता येईल अशी वेलीची संकल्पना आता अनेक ठिकाणी मुर्त स्वरुपात येत आहे. याचा प्रत्यय आज सोलापूरच्या सखी मेळाव्यातही आला. सोलापूरच्या महिलांनी आज वेलीच्या सोलापूर क्षेत्रीय कार्याचे रितसर उद्घाटनच केले.वेली म्हणजे महिलांनी महिलासाठी चालवलेली सर्वपुर्ण अशी मोहिम आहे. एक प्रकारचे सखींचे विद्यापीठच.

वेलीच्या केंद्राबाबत सोनकवडे व मोहीतेताई यांनी आपल्या गाव  व परिसरासाठी महिलांना वेलीच्या वतीने कसे प्रशिक्षण देतोय व याचा महिलांना काय व कसा फायदा झाला याबाबत सांगीतले. नेतृत्व विकासाचे प्रशिक्षण घेतलेल्या 42 महिलांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

वेलीच्या माध्यमातून अनेक गावात व परिसरात आता वेली केंद्राची सुरुवात व संचालन सोलापूरसह अनेक जिल्हयात सुरु झालेले आहे. यामुळे या सर्व सखी मिळुन एक मोठा सखी समुदाय आणखी जवळ झाला आहे.

डिजिटल सखी

यावेळी महिलांनी डिजिटल व्हावे यासाठी कॅशलेस इंडियाचा भाग म्हणून एटीएम व स्वाईप मशिनचा वापर कसा केला जातो.याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यापुढे हि सुविधा स्वयम्‌ शिक्षण प्रयोग व सहभागीदार संस्थांच्या वतीने पुढच्या काळात देण्यात येणार याची ग्वाही देण्यात आली. अनेक महिलांनी यामध्ये विषेश रुची दाखवली.

सखी उत्पादकता प्रदर्शनी

मेळावा स्थानी अनेक महिलांनी आपल्या उत्पादनांचे प्रदर्शनही भरवले होते. एकून २५ प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते. यात अनेक उत्पादने ठेवण्यात आली होती.

माध्यमांचे सहकार्य

या मेळाव्याच्या प्रसिध्दीसाठी साम टिव्ही व वृत्तदर्पन या टिव्ही चॅनलच्या प्रतिनिधींनी मेळाव्यात अनेक महिला व कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. याबध्दल सर्व माध्यम बांधव व भगिनींचे आभार

लोकमत,संचार, दिव्यमराठी,सकाळ या वृत्तपत्राचे प्रतिनिधींनी मेळाव्यात येऊन अनेकांच्या मुलाखती घेतल्या व वृत्तसंकलन केले.

या मेळाव्याच्या पुर्ततेसाठी स्वयम्‌ शिक्षण प्रयोग, उमेद, सखी समुदाय कोश व सखी सोशल एंटरप्राईज नेटवर्कच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

संकलन- लिला सोमवंशी, बाळासाहेब काळदाते स्वयम्‌ शिक्षण प्रयोग

फोटोग्राफी - भास्कर सिलवर